“बीपी आणि शुगर वर नियंत्रण हवंय — मग ही दिनचर्या आवर्जून फॉलो करा!”

“डॉक्टर, मी औषध घेतोय तरीही बीपी कधी कधी वाढतोच…”माझी शुगर कधी कमी कधी जास्त… दिवस कसा सुरू करावा हेच कळत नाही!” अशा तक्रारी रोजच ऐकायला मिळतात. खरं तर बीपी आणि शुगर नियंत्रणात ठेवायला फार मोठे उपाय नाही तर फक्त थोडं लक्ष, थोडी शिस्त आणि थोडं प्रेम स्वतःवर!

हे आजार एकदा झाल्यावर कायमचे नष्ट होत नाहीत, पण योग्य उपचार आणि शिस्तबद्ध दिनचर्येमुळे आपण त्यांना नियंत्रणात ठेवू शकतो आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. या ब्लॉगमध्ये आपण बीपी आणि शुगर नियंत्रणासाठी आवश्यक अशा साध्या पण परिणामकारक दिनचर्येची सविस्तर माहिती घेणार आहोत.

१)सकाळची सुरुवात कशी करावी?

सकाळी उठल्यावरच आपल्या दिवसाची दिशा ठरते. म्हणून खालील गोष्टींच पालन करायला हवं

🌅लवकर उठा: रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठा – ५.३० ते ६ च्या वेळी उठल्यावर शरीर तर ताजेतवाने होईलच,पण दिवसभर सकारात्मक ऊर्जा राहते.

💧कोमट पाणी: उठताच एक ग्लास 🥤 कोमट पाणी प्या; त्यांमध्ये लिंबाचा रस किंवा मेथी पावडर घालून घेऊ शकता.

🧘🏻‍♀️ हलका व्यायाम: ३० मिनिटे चालणे🚶🏻‍♀️, प्राणायाम🧘🏻‍♀️, योगासने किंवा साधे स्ट्रेचिंग 🧎🏻‍♀️रोज करावे.

🧘 प्राणायाम आणि सूर्यनमस्कार: रोज ५ ते १२ सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, वजन नियंत्रित राहते आणि ऊर्जा मिळते; तसेच १० मिनिटे प्राणायाम करावा यामुळे बीपी, शुगर, तणाव सगळ्यावर एकाच वेळी उपाय होऊन, ते नियंत्रणात राहण्यास मदत होते.

२) संतुलित आहार घ्या – बीपी आणि शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार सर्वात महत्त्वाचा आहे. आपल्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करा

✅ आहारात फायबर वाढवा: Whole grains (ज्वारी, बाजरी, नाचणी), भरपूर भाज्या, फळे यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

✅ लोणचं, पापड, चटण्या कमी करा: हे पदार्थ जास्त मीठयुक्त असतात ज्यामुळे बीपी वाढू शकतो.

✅ मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवा

✅आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साखर कमी करा.

✅ दर २-३ तासांनी थोडं थोडं खा: मोठ्या प्रमाणात एकावेळी जेवण टाळा.

✅ पाणी भरपूर प्या.

🏃 ३) दिवसभर थोडी हालचाल करा — बसूनच राहू नका!आजकाल बरेच लोक ऑफिसमध्ये ८-९ तास खुर्चीतच बसून राहतात. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

👉 दर ३० मिनिटांनी खुर्चीतून उठून उभे रहा.

👉 फोनवर बोलताना उभे राहा किंवा चाला.

👉 लिफ्टऐवजी जिना वापरा.

👉 स्टेप काऊंट सेट करा — किमान ६००० पावले रोज.

३)मानसिक आरोग्य सांभाळा बीपी आणि शुगर वाढण्यामागे मानसिक ताण देखील मोठे कारण असते, हे टाळण्यासाठी पुढील गोष्टी अंगिकारा.

✅ मेडिटेशन: रोज १० मिनिटे डोळे मिटून श्वासावर लक्ष ठेवा.

✅ आवडता छंद: संगीत, वाचन, बागकाम ई.- मन शांत होण्यासाठी छंद जोपासा.

✅ सतत काम नको: दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा – मित्रांसोबत चहा, कुटुंबासोबत हास्यविनोद ; यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.

🌇 ५) संध्याकाळ आणि रात्रीची दिनचर्या

✅ सायंकाळी हलकी चाल किंवा व्यायाम: ऑफिसमधून आल्यावर ५-१० मिनिटे चालावे.

✅ जड पदार्थ टाळा: रात्री जड, तळलेले किंवा गोड पदार्थ टाळा.

✅ रात्रीचं जेवण लवकर: शक्यतो रात्री ७-८ च्या दरम्यान जेवण करावे; रात्री चालल्याने पचन सुधारते, साखर नियंत्रणात राहते.

✅ चांगली झोप: मोबाईल बाजूला ठेवा. शांतपणे ७-८ तास झोप घ्या.

६) नियमित तपासणी महत्त्वाची

✅ ब्लड प्रेशर तपासा: आठवड्यातून किमान एकदा बीपी मोजा.

✅ ब्लड शुगर तपासा: दर १५ दिवसांनी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी करा.

✅ डॉक्टरांचा सल्ला घ्या: कोणतीही औषधे थांबवू नका किंवा स्वतःहून बदल करू नका.

७) कुटुंबासोबत आरोग्य जपणं

आपल्या घरातील लोकांनी आपली; आणि आपण त्यांची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे, यामुळे चांगला सपोर्ट मिळतो.

✅ कुटुंबासोबत चालायला जा.

✅ एकत्र आरोग्यदायी पोषक असे पदार्थ खा.

✅ एकमेकांना लक्षात ठेवून औषधे द्या.

📍निष्कर्ष-

बीपी आणि शुगर नियंत्रणात ठेवणे ही एकदिवसीय गोष्ट नाही. सतत प्रयत्न, योग्य जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच यावरचे सर्वोत्तम उपाय आहेत. आपल्याला हळूहळू बदल करायला सुरुवात करावी लागेल आणि तेच आपले आरोग्य सुधारण्यास मदत करतील. स्वत:वर प्रेम करा, शिस्त पाळा आणि निरोगी आयुष्य जगा!

जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.आरोग्याशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग फॉलो करा!

तुमचे प्रश्न खाली कॉमेंट करा — उत्तर देण्यासाठी आम्ही आहोतच!

✅ आमच्या क्लिनिक ला भेट द्या आणि अधिक माहिती घ्या! 🩺 सुखकर्ता क्लिनिक, तळेगाव दाभाडे.

Leave a Comment